आता सर्व सुरळीत झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिरूर येथे जावे लागते तांदळी ते निर्वी या मार्गाने मुक्कामी तांदळी बस बंद असल्यामुळे सकाळी महाविद्यालयात पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राष्ट्रीय मानव अधिकार शिरूर शहर अध्यक्ष शकील मनियार यांनी संघटनेच्या मार्फत पाठपुरावा केला ग्रामपंचायत मासिक ठराव मंजूर झाल्यानंतर हा ठराव आगार प्रमुख यांच्याकडे देण्यात आला होता व कोणताही विलंब न करता केलेल्या मागणीस प्रतिसाद देऊन बस सेवा पुर्वरत सुरु करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बस चालक घावटे व वाहक रासकर यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी आगार प्रमुख सुरेश शिर्के, लेखाकर इरशाद मणियार, सहाय्यक वा.अ. भैरवनाथ दळवी, वाहतूक निरीक्षक लोहकरे, यांचे विशेष आभार मानले यावेळी प्रदीप साळुंखे, संतोष सोनवणे,योगेश सोनवणे, बबन वाबळे, लक्ष्मण शहाणे, ज्ञानेश्वर शहाणे,पंडित आखुटे, मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण शिरूर शहर अध्यक्ष शकील मनियार,सरचिटणीस एकनाथ थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी लाल परी सज्ज झाल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना दिलासा मिळाला.

