सुनील भंडारे पाटील
पेरणे तालुका हवेली येथील इंदिरा नगर मध्ये ग्रामपंचायत पेरणे व ग्रामस्थ यांच्या वतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली,
यावेळी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून, उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये उमाजी नाईक यांच्या जीवना विषयी नवीन पिढीला प्रेरणा कशी मिळेल याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले,
याप्रसंगी पेरणे गावचे सरपंच रुपेश बापू ठोंबरे, उपसरपंच वर्षा वाळके, माजी उपसरपंच शिवाजी वाळके, किरण भंडलकर, अतुल वाळके, पंडित वाळके, शांताराम वाळके, अनिकेत वाळके, बाबासाहेब कुंभार, राहुल गुंडकर, अमोल भंडलकर, सुहास धर्माधिकारी, बाळासाहेब मलाव, संदीप भंडलकर, नितीन मलाव, अक्षय गायकवाड, गोरक्ष कंचे, गणपत भंडलकर, किरण शिरसाट, आप्पासाहेब गायकवाड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,

