जातेगाव बुद्रुक (तालुका शिरूर) येथील श्री संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस व सारथी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त होण्याचा सन्मान मिळविला आहे .
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एनएमएमएस परीक्षा व महाराष्ट्रातील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे असल्याची माहीती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली आहे .
एनएमएमएस परीक्षेत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- आर्या सचिन तुपे (१३१ गुण), श्रीनाथ सुभाष बगाटे (१२१ गुण), प्रणव तुकाराम गायकवाड (११७ गुण), गौरी नवनाथ उमाप (११४ गुण), सार्थक बाळू फणसे (१०४ गुण), समीक्षा इरबजी मोरताटे (१०१ गुण). सारथी शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यांस ३८ हजार ४०० मिळणार आहे. सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- प्रणय दत्तात्रेय मासळकर, तनिष्क अतुल मासळकर, साक्षी सचिन इंगवले, आर्यन राजाराम नळकांडे, यश शहाजी उमाप, वेदांत हनुमंत मासळकर, विश्वजीत राहुल सातपुते, आदित्य प्रभकर भिसे, श्रावणी उल्हास क्षिरसागर, आर्यन मधुकर उमाप, कृष्णा शरद खळदकर, समीर गोरक्ष शिवले, सार्थक संदीप वारे, नम्रता सचिन खंडाळे, वेदिका निलेश मासळकर, आयुष मच्छिंद्र उमाप, सृष्टी अश्विन गंगेकर, एकनाथ आप्पा मोरे, राजवर्धन सुभाष कोकणे, आर्यन अमोल गैंद, अक्षय संजय घाडगे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कांतीलाल धुमाळ, शंकर भुजबळ,
रमेश जाधव, अनिता तांबे, प्रिया उमाप, प्राचार्य रामदास थिटे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार, कांतीलाल उमाप, सरपंच किशोर खळदकर तसेच सर्व संचालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेचा मुख्य उद्देश समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे, त्यानुसार आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे हा आहे. सबब या परीक्षांचा स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणून ध्येय नजरेसमोर ठेवत आधिकाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे असे आवाहन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष रामदास थिटे यांनी केले आहे.