March 30, 2026
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
      कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी (तालुका पुरंदर) येथे गणेश उत्सवानिमित्त स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने व शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने कला उत्सवाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे भानुकाका जगताप म्हणाले विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव मिळावा तसेच भविष्यात यातूनच व्यावसायिक व चांगले रंगावलीकार निर्माण व्हावेत अशा हेतूने प्रतिष्ठान हे उपक्रम राबवते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी खास करून मुलांचे कौतुक केले.कारण मुलींबरोबर मुलांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट रांगोळ्या काढल्या होत्या.या स्पर्धेत हायस्कूलमधील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सामाजिक संदेश देणाऱ्या विविध विषयावरील रांगोळ्या विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या. रांगोळीचे परीक्षण करून दोन गटांमध्ये नंबर देण्यात आले लहान गटांमध्ये

 प्रथम क्रमांक  कु.आरती दीपक कामठे 
द्वितीय क्रमांक  कु.श्रावणी भाऊसो कणसे.
 तृतीय क्रमांक  कु.श्रेया संदीप कदम.
मोठ्या गटांमध्ये 
प्रथम क्रमांक  कु.श्रद्धा सतीश कामठे.
 द्वितीय क्रमांक कुमार.तन्मय बाळासाहेब कामठे 
तृतीय क्रमांक कादंबरी शिवाजी कामठे
यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कला उत्सव उपक्रमास शिक्षिका प्राजक्ता झेंडे, मेघा वडेकर, हसीना आतार, सुषमा भोसले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमास नीरा मार्केट कमिटीचे संचालक भानुकाका जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, चैतन्य बहुउद्देशीक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भालेराव, मुख्याध्यापक चांगदेव मस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोकरे यांनी केले व आभार प्राजक्ता झेंडे यांनी मानले.