शीतल म्हात्रे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो मोर्फिंग करून सुप्रिया मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या आहेत असे दाखवून तो फोटो ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित करून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले.या वेळी माझ्या सह कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप सर ,बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज भैय्या जाधव ,निरा कोळविहिरे गट अध्यक्ष बाप्पू भोर , पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार , सोमनाथ खोमणे ,तालुका उपाध्यक्ष युवराज जगताप , आकाश शिळीमकर ,अभय थोपटे ,रविंद्र मोरे ,राहुल भोंगळे ,जेजुरी शहर सोशल मीडिया अध्यक्ष शहाबाज पिंजारी , तेजस चाचर , श्रीपाद गुरव , अमित झेंडे , स्वप्नील जाधव ई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

