March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
            हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे राजे उमाजी नाईक

परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाईक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत. तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मरण पुढील पिढीसाठी व्हावे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळविण्यासाठी जयंती साजरी केली जाते या अनुषंगाने दि-२४-सप्टेंबर-२०२२ रोजी जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुका आयोजित आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ जयंती सोहळा सावरगाव ता.पारनेर येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते.मा.श्री.दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब (भाऊ) शिरतार,सुनिल (भाऊ) माकरे,गणेश (भाऊ) शिरतार,शिवाजीराव जेडगुले,भाऊ गाडेकर,संदीप शितोळे,बाळासाहेब गुळवे,आप्पासाहेब बोरूडे,भास्कर बोडरे,सारीका ताई लांडगे,आल्पना ताई बोडरे,यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटना अ.नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.