गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना जाधववस्ती वाघोली येथून या टोळीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले.
जाधववस्ती वाघोली परिसरात सापळा रचून आरोपी नावे १) अजय मांगीलाल काळे वय २५ वर्षे रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे. २) रोहित रामदास वाजे वय २७ वर्षे रा. जुना मोशी आळंदी रोड, चौधरी ढाबा समोर, मानस अपार्टमेंट, फ्लॅट नं.४ मोशी पुणे. ३) वचिष्ठ श्रीमंत मुंढे वय २१ वर्षे रा. जोगेश्वरी हायस्कुल समोर, केसनंद वाघोली रोड, केसनंद, पुणे मुळगाव वडवणी ता. वडवणी जि.बिड, ४) कुमार नामदेव शेलार वय २२ वर्षे रा. व्दारका निवास, काळूबाई नगर वाघोली पुणे. ५) सुरज भैरवनाथ चौगुले वय २३ वर्षे रा. आव्हाळवाडी, वाईन शॉपचे पाठीमागे, मुळ गाव उत्तर वडगांव ता. करमाळा जि. सोलापूर, ६) सुनिल कोळप्पा विटकर वय ३४ वर्षे, रा. काळूबाईनगर लेन नंबर ४, वाघोली पुणे. मुळगाव मार्डी ता. उत्तर सोलापूर यांना ताब्यात घेऊन वरिल सर्व आरोपीनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात दिनांक २६/०९/२०२२ रोजी अटक करुन भा.दं.वि. कलम ३९५ ४११ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनचे ६ व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे ६ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


