विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त आपल्या स्वतःच्या हाताने आकाश कंदील बनवण्याचा आनंद या कार्यशाळेतून घेतला. प्रशालेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांकडे उपजत असणारे काही कौशल्य विकसित व्हावे त्यातून त्यांना प्रेरणा व कला गुणांना वाव मिळावा या हेतून शाळेत असे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज शाळेत अकाश कंदील या कार्यशाळेच्या माध्यमातूल सुंदर आकर्षक पर्यावरण पुरक असे ४०० अकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात या कार्यशाळेत सहभागी झाला त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण दिसत होते. इको फ्रेडली वस्तूंचा वापर करून अतिशय माफक खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये सुंदर व आकर्षक अशा प्रकारचा आकाश कंदील तयार केला. वैशिष्ट म्हणजे तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या घरावर दिवाळीच्या सणासाठी लावून सुशोभित करता येणार आहे. या उपक्रमाला अनेक पालकांनी उपस्थित राहून आपल्या मुलांची कला पाहीली.

