वढू बुद्रुक (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये राज्याच्या पूर्व भागातून ऊस तोडनी मजूर यांच्या टोळ्या दाखल झाल्या असून, लवकरच ऊस तोडणी ला वेग येणार आहे,
या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस बागायत क्षेत्रातून सदन पद्धतीने शेती केली जात आहे, भीमा नदीचा हा पट्टा ऊस उत्पादन मध्ये अग्रेसर असून घोडगंगा सहकारी साखर कारखाना, व्यंकटेश कृपा सहकारी साखर कारखाना या गटातील कारखान्यांना ऊस तोडणी उरकत नाही, गेले कित्येक वर्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, अनुराज साखर कारखाना, इत्यादी साखर कारखाने गेट केन म्हणून उचलतात, तरी देखील ऊस तोडणी साठी ऊस उत्पादकांची ऊस तोडणी साठी ससे होलपट होते,
यावेळी लवकर साखर कारखाने सुरू करण्याचे प्लॅनिंग असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने, गावांमधील व शेतामधील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद आहेत, पाऊस थांबल्याने रस्ते तयार करण्यासाठी वेळ जाणार आहे,







