याप्रसंगी माजी आमदार सुर्यकांत पलांडे , पोपटराव गावडे , बापूसो पठारे , आमदार अशोक पवार, भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासो बेंडे पाटील , प्रदिप वळसे, प्रमोद वळसे, अरुण चांभारे, खेडचे पं. स सभापती अरुण चौधरी , जि .प . सदस्या कुसूम मांढरे , सविता बगाटे , दुधसंघाच्या चेअरमन केशरताई पवार, पी के अण्णा गव्हाणे, उपसभापती सुनिल तांबे,कात्रजचे संचालक लताताई गोपाळे , तानाजी जगताप , चंदकांत भिंगारे , बाळासो खिलारी ‘ शांताराम शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , बाळासो नरके, शिवाजी दरेकर , नवनाथ हरगुडे व शिरूर हवेली आंबेगाव तालुक्यातील हजारो पदाधीकारी व ग्रामस्थ उपस्थीत होते . माजी आमदार पलांडे , गावडे ‘ पठारे आदींनी श्रद्धांजली वाहीली .
‘ आजी संसार सुफल झालागे माये , देखियले पाय विठोबाचे ‘ या माऊलींचे अभंगावर बोलताना माणसाने आधी स्वशरीराची काळजी घ्यावी , हर्ट अँटक म्हणजे मानसीक ताणतणाव , आणि तो न येण्यासाठी नितीनियम निसर्गनियम पालन करावेत . तारुण्यात मरण हे नशिबाने नसते तर नशेने , निराशेने, ओव्हर स्पिडने वा अलिकडे मोबाईलच्या नादातही येते . प्रेताची राख गोधड्या नदीत टाकू नयेत , कपडे साड्या मयता बरोबर न जाळता गरीबास दान कराव्यात . मोबाईल मुलांचे हाती देवू नयेत , लग्नांती ल फेटे फटाके न उडवता शाळेसाठी मदत करावी , भांडण तंटे करून पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये आदी प्रबोधन त्यांचे खुमासदार शैलीत केले . माजी सभापती प्रकाश पवार, बालाजी शिक्षण संस्थाध्यक्ष सदाण्णा पवार यांनी सर्वांचे स्वागत केले . इंगवले सरांनी सुत्रसंचलन तर प्रा . रामदास थिटे यांनी आभार मानले .


