आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक इंद्रायणीतीरी स्नानासाठी येत असतात, त्या कार्यक्रमामुळे आळंदी दगडी घाटावरील भाग हा तेलकट झाल्यामुळे घसरडेपणा सारखी परिस्थिती होती. इंद्रायणी दगडी घाटावर दुर्घटना घडण्याची शक्यता होती याबाबत आळंदीतील आळंदी जनहित युवा मंच या सोशल मीडिया ग्रुप वरती येरवडा येथीलहमकांत ऊर्फ बाळासाहेब आल्हाट यांनी मत व्यक्त केले होते, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख यांना विनंती करण्यात आली, याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आरिफ शेख यांनी सदर परिस्थिती ची माहिती दिली आणि दक्षता घेण्याची विनंती केली त्याबाबत आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी तात्काळ लक्ष देत आळंदी नगरपालिकेच्या अग्निशामकदल आणि नगरपरिषद कर्मचारी यांना घाटावरती स्वच्छतेचे आदेश दीले ,

