March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
    राज्यामध्ये गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असताना आता पुणे शहरातील वाघोली मधील गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे वाघोली मधील जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वाघोली मधील गायरान क्षेत्रावर झालेले अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी केली आहे,    

वाघोली मध्ये जवळपास अंदाजे दीडशे ते दोनशे एकर गायरान क्षेत्र असल्याचे बोलले जात आहे या गायरान क्षेत्रावर जवळपास सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.नुकतीच अतिक्रमण मुक्त वाघोलीच्या बाजार तळाची जागा न्यायालयासाठी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडुन हालचाली चालू झाल्याने वाघोलीतील अतिक्रमण हटाव ही मोहीम देखील जोर धरू लागली आहे.

 वाघोली मधील जेष्ठ नागरिक किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शिवरकर, या सह सामाजिक कार्यकर्ते किशोर सातव यांनी वाघोली मधील गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण हटवावी अशी मागणी केली आहे. वाघोली मधील शासकीय संस्थांना जागा देण्यास आमचा विरोध नाही परंतु प्रथमता शासकीय गायरान क्षेत्रावर झालेले अतिक्रमण हटवावी आणि त्यानंतरच शासकीय संस्थांना तसेच एसआरए सारख्या प्रोजेक्टसाठी जागा द्याव्यात अशी देखील मागणी केली जात आहे       
     वाघोली परिसरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था,संघटना या गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणा वरून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे बोलले जात आहे तर वाघोलीचे राजकारण देखील या गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणांभोवती  फिरत असल्याचे दिसत आहे