March 30, 2026
दहिवडी प्रतिनिधी 
        दहिवडी (तालुका शिरूर) येथे आज दुपारी अज्ञात माथेफिरूव्यक्तीने जवळपास साडे तीन एकर ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला सर्व ग्रामस्थांनी उसामध्ये अज्ञात व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो फरार होण्यास यशस्वी झाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,

  यामध्ये या अज्ञात व्यक्तीने दुपारच्या सत्रामध्ये अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक सलग असे सहा जणांचे ऊस पेटवून देऊन फरार झाला दहिवडी व मांजरे वस्तीवरील सर्व ग्रामस्थांनी व तरुण युवकांनी ऊसाला लागलेली आग  विझवण्यात मोलाचे सहकार्य केले या नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांमध्ये श्री.माणिक चव्हाण,  सिताराम मांजरे, आप्पा,  बापू मांजरे,  रोहिदास दौंडकर,  रामभाऊ दौंडकर या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आग विझवण्यामध्ये सचिन लवांडे, विकास गारगोटे,विशाल गारगोटे,राहुल मांजरे,अनिल मांजरे,सचिन मांजरे,संतोष मुळीक, धनंजय गायकवाड, देविदास दौंडकर,राहुल लवांडे, अविनाश मांजरे,संतोष गायकवाड, देविदास गारगोटे, सोनू मांजरे  या युवकांनी मोलाचे सहकार्य केले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.