March 30, 2026
 सणसवाडी प्रतिनिधी 
      भविष्यात मिडगुलवाडी हे गाव हे महाराष्ट्राला दिशा देणारे गाव असेल , अति दुष्काळी  शासन    दुर्लक्षीत अशा मिडगुलवाडी गावाचा विकास ध्येयवेड्या ग्रामस्थांनी फियाट कंपनी व भोसरीचे आमदार महेश लांडगेच्या दातृत्वातून केला व हे पहाणेस महाराष्ट्र व देशभरातून जिज्ञासू अभ्यासक येवू लागले . काल गाव पहाण्यासाठी मेघालय मधून टीम आली . त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक करताना, ‘अधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र काम करा तसेच या परिसरातील शासनाचे प्रतिनिधी ,  ग्रामसेवक , डाटा ऑपरेटर ,शिक्षक किंवा सरपंच उपसरपंच हे जेव्हा गावाचा एकत्रित विचार करतात हे या गावाचे  वैशिष्ट्य इतर गावांनी शिकले पाहिजे , आपल्याकडील पायाभूत सुविधा जर पाहिल्या तर गावातील ग्राम विकास सुविधा आरोग्य ,पाणी, शिक्षण ह्या सुविधा मिडगुलवाडी गावच्या प्रगतीपथावर असल्याने त्याची दखल इतर राज्याने घेतली पाहिजे ,असे आवाहन  मेघालय राज्याचे सहाय्यक व्यवस्थापक हिलरी नॉगशियांग भेटीवेळी यांनी केले.   

  मिडगुलवाडी (ता . शिरूर) येथे पाहणी करण्यास आले असता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिडगुलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मेघालय राज्यातील पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात फेटे बांधून गावातून मिरवणूक काढून स्वागत करणेत आले . मेघालय राज्यातून आलेल्या रिसर्च अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट महिला राजस्ता यांच्या टीमने मिडगुलवाडी  ग्रामपंचायत येथे भेट देत महिला सरपंच – उपसरपंच , ग्रामसेवक , सदस्य यांचा गाव कारभार कसा चालतो. गावाचा कारभार पाहताना महिलांना कोणत्या अडचणी येतात , त्यावर कशी मात केली जाते हे जाणून घेत महिलांना मार्गदर्शन केले.

   

        ग्रामपंचायत कार्यालय , सोसायटी कार्यालय , रेशन दुकान जिल्हा परिषद शाळा , महिला बचत गट, अंगणवाडी व मंदिर व ग्रामीण जनजिवनाचा अभ्यास गाव भेट दौरा होता . तसेच जिल्हा परिषद शिक्षक सोसायटी सचिव व सेवक , अंगणवाडी सेविका मदतनीस ,स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी पाहुण्यांनी विकास कामावर चर्चा केली .

      स्वागत मुख्याध्यापक कांदळकर यांनी तर प्रस्तावना सोपान मिडगुले यांनी केली .यावेळी मेघालय राज्याचे एव्हलीन मोमीन कार्यक्रम सहयोगी, आर एस सी डी  कार्यक्रम सहयोगी सलमान मारक ,प्रकल्प संचालक आर एस सी डी दत्ताभाऊ गुरव,विभागीय समन्वयक पश्चिम महाराष्ट्र महिला राजसत्ता आंदोलन सुनंदाताई मांदळे ,जिल्हा समन्वयक सावित्री अकादमी सुरैय्या पठाण , ऍडमिनिस्ट्रेशन समन्वयक  संदीप पवार ,कार्यक्रम समन्वयक इशाद ,प्रज्ञाताई आवाडे ,मयुरी लाड ,सरपंच वर्षा मिडगुले उपसरपंच सतीश इचके , माजी  आदर्श सरपंच प्रभावती मिडगुले , ग्रामसेवक संतोष गायकवाड,  रांजणगाव फियाट ऑटोमोबाईल कंपनीचे व्यवस्थापक सरवर शेख ,सचिव सुखदेव खर्डे , बाळासो मिडगुले  ,चेअरमन विष्णू मिडगुले, आनंदामिडगुले  , अंबर गाजरे, विणेकरी फक्कड मिडगुले ,माजी उपसरपंच मुकुंद   मिडगुले, शरद पोकळे  तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी मिडगुले , ह भ प पोपट महाराज मिडगुले, सोसायटीचे उपाध्यक्ष दता शिवले  , सदस्य काळुराम गाजरे , संजय पिंगळे,अमोल मिडगुले, रंगुबाई मिडगुले, जिजाबाई मिडगुले,माजी सरपंच महादू गाजरे, नवनाथ मिडगुले,सुनील मिडगुले ,कैलास मिडगुले , ग्रा. सदस्या संध्या मिडगुले, कोळेकर,संपतराव कांदळकर . गायकवाड सर , भक्तीराम गाजरे, उद्योजक सोपान मिडगुले  तसेच सर्व आजी-माजी सरपंच संचालक व महिला बचत गट  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन हभप पोपट महाराज यांनी केले .