गेल्या अनेक वर्षांपासून वढु बुद्रुक येथील वढू कोरेगाव भीमा रस्त्यावर असलेल्या कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली सुदैवाने यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही, परंतु मोठे आगीचे लोळ यामुळे प्रोडक्शन साठी वापरण्यात येणारे बरेचसे साहित्य जळून खाक झाले, यामध्ये लाखो रुपयाचे नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे, घटनास्थळी वाघोली येथील फायर ब्रिगेडचे, कर्मचारी व आगीचा बंब यांना आग विझवण्यासाठी बोलावण्यात आले, परंतु दुपारी ऐन उन्हात लागलेल्या आगीमुळे आगीची तीव्रता जास्त होती, आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी देखील प्रयत्न केले, आगीची तीव्रता व आकाशात धुराचे लोळ तीन ते चार किलोमीटर वरून दिसत होते, रस्त्यावरील ट्रॅफिक मुळे आळंदी रांजणगाव आणि वाघोली या ठिकाणच्या आगीच्या बंबांना पोहोचण्यास उशीर झाला, संबंधित कंपनी ऑटोमोबाईल्स लाईन मध्ये फोम बनवण्याचे काम करते, त्यामुळे हे फोम, व त्यासाठी लागणारे कच्चे साहित्य तीव्र ज्वलनशील असल्याने आगीचा भडका एवढा मोठा होता की, खूप मोठे नुकसान झाले आहे,

