March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
           कदमवाकवस्ती (ता हवेली) हद्दीत  भरविण्यात आलेल्या वंडरफुल क्रिकेट स्पर्धेत इंजिनीयरींग  ग्रुपने सिक्युरिटी ग्रुपचा पराभव करून विजेतेपद पटकावले,    

 या स्पर्धेचे उद्घाटन विजय परचुरे सर, तात्या वाडकर , प्रतीक खेडेकर यांनी केले. यावेळी  प्रथम क्रमांकास ५५५५ रोख रक्कम तात्या वाडकर व सुनील गावडे यांच्या कडून तर  आकर्षक ट्राँफी सचिन सुंबे यांच्या कडून देण्यात आली. द्वितीय क्रमांकास सुरज भापकर व सागर घाडगे यांच्या कडून ३३३३ रोख रक्कम व आकर्षक ट्राँफीआकाश आवटे यांच्या कडून देण्यात आली .सर्वोत्तम खेळाडू ,सर्वोत्तम फलंदाज सर्वोत्तम गोलंदाज  यांना विविध मान्यवरांकडून बक्षीसे  देण्यात आली.बक्षीस वितरण समारंभ समीर माने सर  व पवनकुमार शर्मा सर यांच्या हस्ते घेण्यात आला. यावेळी समीर माने सर  यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट केल्याबद्दल आयोजक दादा जाधव यांचा सत्कार केला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अतिशय  उत्कृष्ट करण्यात आल्यामुळे पंचक्रोशीतुन  या क्रिकेट स्पर्धेचे कौतुक होत आहे.सुत्रसंचालन राजेश ऐटेकर यांनी केले. या स्पर्धेला परिसरातुन आलेल्या प्रेक्षकांनी भरघोस पाठिंबा दिल्यामुळे खेळाडूंना क्रिकेट खेळताना अतिशय उत्साह येत होता. यावेळी बाळासाहेब मंडलिक ,रणधीर टकले ,रोहित कामठे ,नितीन टकले आदी उपस्थित होते.