March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
            वाढत्या महागाईच्या काळात शेतीमालाचे भाव मात्र पार घसरलेत, कष्टाने पिकवलेला शेतीमाल होत आहे मातीमोल उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही, केंद्र शासनाने व राज्य शासनाने शेतमालाला हमीभाव देण्याची गरज,           

  जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला संबोधले जाते, परंतु अख्या जगाला अन्नधान्य देऊन जगवलेल्या जनतेला मात्र शेतकऱ्याचा पूर्णपणे विसर पडला आहे, जनतेकडून, केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्याची कायम हेळसांड होताना दिसत आहे, शेतीमध्ये पिकवलेल्या सर्व प्रकारची तरकारी, कांदा,बटाटा ला सद्यस्थितीत पूर्णपणे मातीमोल बाजार भाव मिळत आहे, कित्येकदा तर मालविक्री न झाल्याने तिथेच कचराकुंडीत फेकून द्यावा लागतो, माणसाला जगण्यासाठी अन्नधान्य, तरकारी, भाजीपाला, किराणा याची नितांत गरज असताना, हे पिकवणाऱ्या जगाच्या पोशिंदाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे, समाजात नित्य उपयोगी सर्वच वस्तूंच्या किमती चार पटीने वाढले आहेत, मात्र उत्पादन खर्च चार पटीने वाढवून शेतमालाला  मात्र मातीमोल किंमत मिळत आहे,       

 सद्यस्थितीत बाजारात मेथी, कोथिंबीर ची जुडी ५ रुपयाला मिळत आहे, आज तसे विचार केला तर ५ रुपयाला चहा पण मिळत नाही, मेथी कोथिंबीर पिकवण्यासाठी किती खर्च येतो त्यासाठी त्या शेतकऱ्याचे कष्ट किती याचा आजिबात विचार न करता, शेतकऱ्याचा खर्च, कष्ट मातीमोल केले जातात, एकदा शेतकरी सोडून समाजातील इतर स्तरातील व्यवसायिकांनी एकदा शेती करून पहा मग त्यांना कळेल शेती काय असती? किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वस्तू घेऊ नका आणि मग जगा म्हणजे शेतकऱ्याचे महत्व समजेल,

एवढी वर्ष शेती व शेतकऱ्यांनी चाललेली हेळसांड जर थांबवायची असेल तर शेतकऱ्यांनी फक्त एक वर्ष शेती स्वतःसाठी पिकवली पाहिजे, पिकवलेला माल बाजारात न नेता शेतकरी बांधवांत शेतमाल देवाण-घेवाण करून चालवले तर नक्कीच बळीराजाचे महत्व जनतेला व सरकारला समजल्याशिवाय राहणार नाही, खरंच ही शेतकऱ्याची व्यथा आहे,