March 30, 2026
शिरूर प्रतिनिधी 
       शिरूर येथील घोडनदीत पात्रात तरंगताना मुतदेह आढळून आला. तो मृतदेह पाहिल्यावर सुमीत सुरेश कानेटकर ( वय ३२ ) राहणार साई प्लाझा मगर हॉस्पिटल पाठीमागे , शिरुर , मुळ रा . मु.पो , आर्वी ता . आर्वी , जि . वर्धा , असे मयत व्यक्तीचा  असुन याबाबत त्यांची पत्नी आरती सुमित कानेटकर ( २४ वर्ष ) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे .          

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीत कानेटकर हे घरातुन रोज सांयकाळी शिरूर येथील डोंगरावर फिरायला रोज जात होते . मंगळवार ( दि २७ ) रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते बाहेर फिरायला जातो असे सांगुन घरातुन निघुन गेले . परंतु ते रात्री घरी परत न आल्याने त्यांची पत्नी आरती हि शोध घेण्याकरीता शिरूर येथील डोंगरावर तसेच घोडनदी पुलावर गेली असता . त्यावेळी त्यांच्या पतीची मोटार सायकल घोडनदीकडेला उभी केलेली दिसली .

        त्यानंतर त्यांना घोडनदी पुलावर लोक जमा झालेले दिसले म्हणुन त्यांनी तिथं जावुन पाहिले . त्यावेळी त्यांच्या पतीचा मृतदेह घोडनदी पात्रात तरंगताना दिसला . या घटनेचा पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गवळी करत आहे