1977 च्या अगोदर आदरणीय शरद पवार साहेब यांनी वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे समाधी स्थळाच्या विकासासाठी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक ट्रस्ट ची स्थापना केली, त्यावेळी पवार साहेबांचे सर्व खंदे समर्थक या संस्थेवर काम पाहत होते, या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून बापूसाहेब थिटे, चिटणीस गो,ना, वाघ, सरचिटणीस दगडू धोंडीबा भंडारे, हे होते शनिवार दिनांक 17 डिसेंबर 1977 रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले, हे अनावरण देशाचे थोर नेते यशवंतराव चव्हाण, कामगार व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य शंकररावजी पाटील यांच्या हस्ते झाले,
स्वतः आदरणीय शरद रावजी पवार साहेब, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, यांच्या हस्ते भूमिपूजन 3 मे 1976 रोजी संपन्न झाले, त्याचा नामफलकही समाधीस्थळी लावण्यात आला होता, हा नाम फलक फोटो बातमीला जोडला आहे वाचकांनी व्यवस्थित पाहून घ्यावा भरारी न्युज तर्फे विनंती, या नाम फलकावर धर्मवीर शंभू राजांचा “धर्मवीर” असा स्पष्ट उल्लेख आहे, शिवाय शरद रावजी पवार साहेबांचा देखील स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे 50 वर्षांपूर्वी काकांना “धर्मवीर” मान्य होते, मग आता पुतण्याला धर्मवीर उपाधीचे वावडे का? असा सवाल वढु बुद्रुक तुळापूर ग्रामस्थांकडून विचारला जात आहे,


