चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे तसेच दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून शिरूर तालुक्यात नावारूपास आले आहे चासकमान धरणाच्या या आवर्तनाने दहिवडी परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे *दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव* म्हणून शिरूर तालुक्यात नावारुपास आल्याची माहिती उपसरपंच पल्लवी सचिन गारगोटे यांनी दिली.
येथील डाव्या कालव्याचे पाणी योग्य वेळी आल्याने पाण्याचा प्रश्न तूर्तास दोन महिने तरी सुटलेला आहे त्यामुळे परिसरातील *गहू,कांदा, हरभरा, कोबी व उसाच्या* उत्पादनाला खूपच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे चासकमान धरण्याच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडल्याने दहिवडी येथील गेल्यावर्षी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओढ्याचे खोलीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढल्याने परिसरातील *बोरवेल व विहिरींच्या* पाणीपातळीत भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस,कांद्याचे पीक हरभरा,कोबी व गव्हाच्या पिकाला पुरेपूर फायदा होणार असल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती. तसेच ग्रामस्थांच्या वतीने चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्याचे *जलपूजन* करण्यात आले.