March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात 
       पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील गुनाट या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.    

   निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक शुभांगी पोळ मॅडम आणि सरपंच संदेश करपे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.२३) वार सोमवार रोजी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेऊन या सभेत छकुली धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

गुनाट या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे पहिले दोन वर्षे तत्कालीन उपसरपंच रोहिणी गव्हाणे यांचा दोन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत छकुली गोरक्ष धुमाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.      

ग्रामपंचायतीची पुढील विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ गुनाट व सुंदर गुनाट परिसर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस छकुली गोरख धुमाळ यांनी बोलून दाखविला आहे. या निवडीदरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी चेअरमन, संचालक, पुणे जिल्ह्यामधील सर्व आजी,- माजी राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, समस्त-ग्रामस्थ गुनाट इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहुन नवनिर्वाचित उपसरपंच छकुली गोरक्ष धुमाळ यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सतीश सोनवणे सर यांनी केले तसेच सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार नवनाथ धुमाळ सर यांनी मानले.