याबाबत रोहन राकेश पाठक वय 23 राहणार पाठ वस्ती शिक्रापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे, शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर येथील चाकण चौकामध्ये रोहन व त्याचा मित्र अजय रामराव चव्हाण राहणार करंदी हे दोघेजण चाकण चौकामधील सागर चायनीज चे बाजूला नितीन सय्यद यांचे पान शॉप वरून सिगारेट घेऊन ओढण्यासाठी बालाजी थेटर बाजूस थांबले असता रात्री 8:30 वाजता अंदाजे 25 ते 27 वर्षाचा 6 फूट उंचीचा, वर्ण गोरा, गोल चेहरा, दाढी असलेला, काळे रंगाचे शर्ट पॅन्ट, असलेला युवक पांढऱ्या रंगाच्या एक्टिवा मोटरसायकल वरून येऊन पाठक याच्या तोंडावर गाडीची लाईट चमकवली, तोंडावर लाईट चमकावल्याचे पाठकने विचारले असता,
त्या अज्ञात आणि शिवीगाळ करत कमरेचा पिस्तूल काढून मागील बाजूस पुढे मागे करून, थांब तुला आता संपवतो असे धमकी देऊन पिस्तुलाचा ट्रिगर दाबला, त्यावेळी पिस्तुलातून एक गोळी हवेत बाहेर पडली, त्यानंतर पुन्हा आरोपीने पाठक याच्या कपाळावर पिस्तूल लावून शिवीगाळ करून निघून जा नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे या अज्ञाताविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार नवनाथ नाइकडे करत आहेत,


