राजकारणामध्ये जिंकून येण्यासाठी किंवा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी माफ आहेत, या सर्व गोष्टींचा उपयोग करून राजकारणी आपलं अस्तित्व टिकून ठेवत असतात, परंतु आता राजकारण एवढ्या खालच्या थराला गेले आहे की, राजकारण्यांनी आता सरळ वीर पुरुष, देवदेवतांवर चुकीचे बोलण्याचे चालू केले आहे, आपल्या सोयीनुसार समाजातील काही स्तरांचा मतदानाचा प्रवाह वळवण्यासाठी तसेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली छाप समाजामध्ये ठेवण्यासाठी चर्चेचा विषय व्हावा म्हणून राजकीय व्यक्तींकडून सतत वीर पुरुष देव देवतावर बोलले जात आहे , यामुळे समाजातील काही स्तरांमधील लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत, तर काही स्तरांमधील लोकांना उकळ्या फुटत आहेत, माणूस एवढा मोठा झाला नाही की, राजकीय स्वार्थासाठी वीर पुरुषांवर, देवाधर्मावर बोलणे योग्य आहे का, अशा चुकीच्या वक्तव्यांमध्ये सर्वच पक्षाच्या लोकनेत्यांचा सहभाग आहे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असावे, चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नंतर माफी मागून किंवा अन्य मार्गाने जनतेच्या तोंडावर पोचारा फिरवायचा, त्यामुळे राजकारणाचा दर्जा घसरला की काय अशी परिस्थिती सध्या समाजात आहे, अशा स्वरूपाची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,

