सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच शिरूर तालुका या ठिकाणी अनेक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
त्याप्रसंगी वाघोलीतील युवा उद्योजक गणेश सातव यांच्यामार्फत मोफत रुग्णवाहिका नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात आली त्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 310 बाटल्या रक्त संकलित केले गेले त्याचबरोबर गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप,ब्लॅंकेट वाटप, चष्मे वाटप, पीयुसी वाटप,आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन यासारखे अनेक सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवा उद्योजक गणेश सातव यांच्या समवेत मित्रपरिवार तसेच आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद ,तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे ,युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे ,महिला उपजिल्हाप्रमुख अश्विनीताई जाधव, तालुकाप्रमुख रेश्मा चौधरी ,जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे ,जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, तालुका संघटक दत्ताभाऊ गिलबिले, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर ,जिल्हा उपसंघटक शिवाजी नवले, उपतालुकाप्रमुख सागर, दरेकर गणेश कोतवाल ,संतोष वरपे, माऊली फराटे ,शरद नवले ,हरिभाऊ भंडारे, बापू मासळकर, जिल्हा सरचिटणीस सीमा पवार, शिक्रापूरच्या माजी सरपंच रोहिणी ताई गिलबिले ,उप तालुका प्रमुख उर्मिला गिलबिले तालुका समन्वयक रूपाली गोरडे , अश्विनी लांडगे, शाखाप्रमुख अश्विनी साकोरे ,साधना शिंदे ,अर्चना सासवडे, सुनिता चौधरी, तृप्ती अवचिते, शिक्रापूर शाखाप्रमुख बंटी गिलबिले, हर्षद दोरगे, आकाश गावडे ,ज्ञानेश राऊत ,राहुल सासवडे ,मंगेश चव्हाण, भानुदास राऊत ,दादा काशीद, अक्षय गिलबिले, दत्ताभाऊ भुजबळ, दिलीप कोठावळे ,दत्ता राऊत ,सचिन सासवडे, तसेच ग्रामस्थ व शाखाप्रमुख मनीषा कांचन सुधा झेंडे ,रामदास हरगुडे , अमोल हरगुडे ,मोहन दरेकर,श्रीनिवास कांचन,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजपा कामगार मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे,पश्चिम महाराष्ट्र कामगार मोर्चा सरचिटणीस संतोष करपे ,माजी अध्यक्ष युवा मोर्चाचे अनिल नवले व अनेक मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिरामध्ये बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षामध्ये बाबासाहेब सासवडे, सत्यवान भुजबळ,सुनिता चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.

