March 30, 2026
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 
       हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार असलेली जयंती व सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाघोली (तालुका हवेल) येथे शिवजयंती साजरी करण्यात आली  सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, वृक्षप्रेमी, गोपालक, बचत गट चालक, उद्योजक, व्यावसायिक, वैद्यकीय, रक्तदाते,गडकिल्ले संवर्धक, युवा कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा सन्मान मानचिन्ह देऊन करण्यात आला.   

    यानिमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा 150 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच लोणी काळभोर  येथील गोल्डन स्पोर्ट अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक अजित साळुंके व तेजस गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट स्वयंरक्षणाचे प्रात्यक्षिक या निमित्ताने सादर केले स्वतःच्या वाढदिवसाचे कोड कौतुक न  करता समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या निमित्ताने सन्मान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श कमलेश बहिरट यांनी यानिमित्ताने समाजापुढे ठेवला आहे,   

 यापूर्वी त्यांनी स्वतःच्या लग्नाचा खर्च टाळून एक रुग्णवाहिका माहिती सेवा समितीच्या माध्यमातून समाजासाठी दिली आहे तसेच दरवर्षी वाघोली परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे कमलेश बहीरट हे माहीती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचे मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासुन सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेत आहेत .

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते ज्योती सातव प्रास्ताविक कमलेश वारघडे मनोगत चंद्रकांत वारघडे संस्थापक अध्यक्ष माहीती सेवा सममिती व आभार उद्योजक विशाल बहिरट यांनी मानले याप्रसंगी  हिंदवी व सद्गुरु पार्क मधील सर्व रहिवासी माहिती सेवा समितीचे सर्व पदाधिकारी तसेच श्रीकांत गांधी  स्नेहल स्टोन केशर उद्योजक ज्येष्ठ पत्रकार दीपक नायक  पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर  संतोष सोपान बहिरट  शिवराज तरुण मंडळ संस्थापक विलास बहिरट बालाजी वाटर सप्लायर्स मोहिनी तांबे महिला अध्यक्ष हवेली  वनिता बहिरट महिला बचत गट अर्चना अर्चना बहिरट  कोमल ढेरंगे आदर्श शिक्षिका शारदा परदेशी बालाजी उद्योगसमुहाचे चे किरण जाधवराव महाराष्ट्र पोलीस शरद मोकाटे नानासाहेब वाघ येरवडा कारागृह जेल पोलीस लोंढे अग्निशामक निवृत्त अधिकारी चव्हाण  सोमा भंडारे रितेश बहिरट नाना बहिरट  अविष्कार बहिरट  गणेश राजाराम कटके डॉक्टर अनिल पायमोडे डॉक्टर श्याम यादव रवी म्हेत्रे संतोष वाघमारे सुरेश राठोड भागवत साखरे मृणाल पवार विलास नवले ऋषी परदेशी आनंद पाटील श्रीनिवासराव सुरेश राठोड विक्रम दातार गोरक्षक स्वप्निल जगताप अमित गायकवाड रक्तदाते गणेश गायकवाड रुग्णवाहक योद्धा योगेश  बर्डे देश रक्षक म्हणून अनिलजी शिवरे श्री बापू गायकवाड ज्येष्ठ नागरिक मोहन आप्पा फराटे  सागर  जगताप अशोक तांदळे विकास धोत्रे डाळिंब गावचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर म्हस्के  मयूर म्हस्के विजय कुंभारकर  काशिनाथ पवार रामदास पवार अनुराग तिवारी दत्ता काकडे पांडुरंग तनपुरे शशिकांत  बाजारे  अतुल शेळके पुष्पेन्द्र सिंग रवी सलगरे स्वप्निल काशीद कार्तिक विटकर अक्षय फराटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते