रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यामध्ये शेकडो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढे प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे मुख्यविश्वस्त ओमकार देव यांनी दिली.
अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता मुख्यविश्वस्त श्री ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
तसेच संकष्टी चतुर्थी निमित्ताने मा.पुजाताई विठ्ठल पवार यांची पोलीस उपअधीक्षक पदी, मा.ॲड.संजय बाबुराव बेंद्रे यांची दि पुणे लॉयर्स कंझ्युमर्स को.ऑफ सोसायटीच्या संचालक पदी, मा.आकाश बांगर यांची एम.पी.एस.सी. अधिकारी रॅंक ४६ पदी, .मोनाली नारायण ढमढेरे यांची सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते संकष्ट चतुर्थी निमित्त श्रींची आरती करण्यात आली त्याचबरोबर श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ आणि श्रींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला. असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा. स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार . विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताञय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक . बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

