March 30, 2026
सणसवाडी – प्रतिनिधी
         जिवनामध्ये आध्यात्माकडे परमार्थाकडे वळण्यासाठी भाग्य लागतं , पुण्याई लागते . आणि त्यांचेच पाय भजन किर्तन परमार्थाकडे वळतात , ज्यांना खरोखर डोकं असतं , असे विचार ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी सणसवाडी येथे रामजन्मोत्सवाचे किर्तनात मांडले .     

दि . २३ ते ३० श्रीमद भागवतकथा सप्ताह , श्रीराम व हनुमान मंदिराचे ५व्या वर्धापन दिन सोहळ्यातील काल्याचे प्रबोधनात ‘राम म्हणता रामची होईचे – पदी वसोनी पदवी घेईजे ‘ या तुकोबारायांचे अभंगावर बोलताना त्यांनी कसे असावे – यांनी कसे असले पाहीजे, यापेक्षा मी कसं असलं पाहीजे , हा विचार करावा . भक्ती भावाचा चष्मा लावला तरच परमार्थ दर्शन होईल . आधी राम नाम स्मरावे सुख आपच घरा येईल , असा विश्वासही महाराजांनी दिला .  

सप्ताहभर सौ शकुंतला सुरेश दरेकर यांचे मातृपितृ पुजन सोहळ्या निमीत संतोषानंदजी शास्त्री यांनी श्रीमद्भागवत कथेवर निरूपण केले . मातापित्याचा स्मृतीचिन्ह देवून सणसवाडी ग्रामस्थांचे हस्ते सन्मान करणेत आला .परीसरातील भाविकांनी ज्ञानदानाचा लाभ घेतला . दता हरगुडे, गोरक्ष भुजबळ , विद्याधर दरेकर यांनी सुत्रसंचलन केले .

महाराज व हभप बाळासो चव्हाण , हभप विकास जाधव , बाळासो मोरे , सिताराम कांचन , रामभाऊ हरगुडे , हरीपाठ मंडळातील सदस्य व गायक वारकऱ्यांचा सत्कार दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे, माजी उपसरपंच शिवाजी दरेकर, नवनाथ विश्वनाथ हरगुडे , मा . उपसभापती आनंदराव हरगुडे, सरपंच सुरेश हरगुडे , बाबासो दरेकर , शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, चेअरमन नामदेव दरेकर , गोरक्ष सुरेश दरेकर , काळुराम हरगुडे, रामदास दरेकर व ग्रामस्थांचे हस्ते झाला . पै बाबासाहेब दरेकर व चेअरमन गोरक्ष दरेकर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन होते .