दरम्यान लैला शेख यांची भ्रष्ट्राचारामुळे २०२१मध्ये तडकाफडकी बदली झाल्यामुळे त्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून रंजना उंबरहंडे , प्रशांत पिसाळ, बालाजी सोमवंशी यांनी काम पाहीले होते. दरम्यान नुकतेच राज्य शासनाकडून बदलीचे आदेश निघाले असून नागपूर रामटेक येथील तहसीलदार बाळासाहेब दादासाहेब म्हस्के यांची शिरूर येथे रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे.या बदली आदेशामुळे शिरूर येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे. शिरूर तालुक्यात असलेली पंचतारांकित औद्यगिक वसाहत,नव्याने करडे येथे सुरू असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचे काम,तालुक्यात जमिनीचे आलेले सोन्याचे भाव यामुळे वाढलेली जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील प्रंचड प्रमाणात वाढले असून सर्वसामान्य नागरिकांची कामे गेल्या काही दिवसांपासून खोळंबली आहेत. पुरवठा विभागात नवीन, विभक्त रेशनकार्ड तीन महीने ऊलटूनही मिळत नाही. सहा -सहा महीने रेशनकार्ड ऑनलाईन होत नाही. संजय गांधी प्रकणात बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर अदयाप कारवाई झाली नाही.१५५च्या केसेसचे निकाल, रस्ता केसेसची, गौण खनिज आदी प्रकरणे प्रंलबित आहेत.सर्वाधिक महसूल खात्यात चिरीमिरी चालत असून भ्रष्ट्राचार थांबवून नागरीकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आव्हान नवनिर्वाचित तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यापुढे असणार आहे.

