बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 232/ 2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोकसेवक संतोष जगन्नाथ पवार (वय 39 वर्ष) पोलीस शिपाई बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण याला 3,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे, यातील तक्रारदार यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी दिलेल्या डिपॉझिट ची रक्कम घरमालक परत देत नसल्याबाबतची तक्रार पोलीस विभागाच्या 100 नंबर वर डायल करून केली होती, या तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांचा वेळ गेला म्हणून मोबदला स्वरूपात संतोष पवार याने 3,150/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार याच्याकडे तडजोडी अंति 3,000/- रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले, या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत,

