या मुलीच्या पोटामध्ये अचानक दुखू लागल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी कोरेगाव भीमा गावातील खाजगी रुग्णालयात नेले असता, तिच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी पोटात दुखण्याचे कारण सांगितल्याने ती मुलगी गरोदर असल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांना धक्का बसला, पीडित विद्यार्थिनी लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याचे माहिती समोर येत आहे, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलगी राहत असलेल्या घराशेजारील राहणारे युवकाने अत्याचार केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे, दुकानातून घरी येताना तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर कोणाला काय सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे मुलीने आईला सांगितले, दरम्यान या पिढीत अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत, या मुलीला विश्वासात घेऊन तिचे नातेवाईक व पोलीस विचारपूस करत आहेत, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक माधुरी झेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पठारे करत आहेत,

