या व्हिडीओतील हरीण पहा भक्ती गिताच्या अभंगाचे तालावर नाचणाऱ्या मुलांच्या शेजारी त्यांचे प्रमानेच बम्हानंदाने नाचत भजनाचा आनंद घेत आहे. अलीकडील नवीन पिढी पहा भजन कीर्तन गायन हरीपाठ या ठिकाणी एकतर जातच नाही आणि त्यांचे व्यस्त पालकही आवर्जुन नेत नाहीत . म्हणून जे चांगलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही .अभंग , भावगीत ,भारूड , गौळण , श्लोक , ओव्या, दोहे , भक्तीगीते यांच्या चाली ह्या डीजे ,आर्केस्ट्रा वा सिनेमाच्या गाण्यांपेक्षाही कितीतरी चांगल्या असतात , पण त्या मुलांच्या वा विद्यार्थ्यांच्या कानावर पडत नाहीत कारणे त्यांना अभंगाची गोडी निर्माण होत नाही .खरंतर डीजे ऑर्केस्ट्राचं गाणं फार तर वर्षभर टिकतं ,पुढील वर्षी ते गाणं दिसत नाही दुसरे नवीन गाणे वाजते .परंतु ७०० वर्षानंतरही संतांचे अभंग प्रत्येक गावोगावी काकडा , भजन ,प्रवचन -कीर्तन या ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने गायले जातात . सुंदर ते ध्यान’, अवघाची संसार ‘ , इवलेसे रोप, कांदा मुळा भाजी हे सारे अभंग आजही नित्य नवे ताजेतवाणे वाटतात . जनाबाई मिराबाई , मुक्ताबाई बहिणाबाई आदी संताचे अभंग शालेय शिक्षणात अभ्यासक्रमात ही असतात पण ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात वा तोंडात बसत नाहीत . पण ती डीजेची शांताबाई मात्र दुरवरून दणकली की टंगड्या उडवीत ही बाळं लुंगी डान्स करु लागतात . आकेस्ट्रात नुसता ‘ मुंगळा मुंगळा ‘ हे गाणं लागलं की कार्टी मुंगळ्या सारखी नाचतात . हा मुंगळा वा ती शांताबाई फक्त एकच वर्ष टिकली , पुढच्या वर्षी यांचा ‘ आला बाबुराव ! यांना ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम आठवत नाहीत , ज्यांच्या अभंग रचना प्राथमिक शाळेपासून कॉलेज पर्यत अभ्यासक्रमात असतात . अगदी इंग्लीश मेडीयम लाही ज्ञानदेवांचा ‘ पैल तो गे काऊ कोकताहे ‘ , तुकाराम महाराजांचा ‘ जे का रंजले गांजले ‘ , सावता महाराजांचा ‘कांदा मुळा भाजी ‘ आदी अंभग कॉलेज पर्यंत अभ्यासार्थ असतात . पण छात्र ते फक्त उतरे लिहून पास होण्यासाठी असतात एवढेच समजतात .

