शिक्रापूर (ता. शिरूर) एल अँड टी फाटा, शिक्रापूर जवळील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या कामगाराचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ संतप्त कुटुंबीयांनी तसेच शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले, मृतदेह थेट कंपनीच्या मुख्य गेटवर ठेवत तीव्र आंदोलन छेडले.
रामपाल सताई दुशद (रा. उत्तर प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव असून ते गेली अनेक वर्षे कंपनीत कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते. चार दिवसांपूर्वी ड्युटीवर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
मात्र, कंपनी प्रशासनाने तातडीने अॅम्बुलन्सची किंवा वैद्यकीय मदतीची कोणतीही व्यवस्था केली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला. परिणामी उपचारास उशीर झाला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
कामगाराच्या मृत्यूला कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईक व कामगारांनी कंपनी गेटवर ठिय्या दिला. त्यांनी रामपाल यांचा मृतदेह गेटसमोर ठेऊन जोरदार निदर्शने केली आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
व पुढील आठ दिवसांमध्ये निर्णय घेऊन त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांना कंपनी व्यवस्थापनाकडून मिटिंग मध्ये चर्चा अंतर्गत आश्वासन देण्यात देण्यात आले आहे.
व्यवस्थापनाकडून कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर शिवगर्जना कामगार संघटना जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.
कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
“माझ्या सहकाऱ्यांचा मृत्यू हा कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा मुळे झाला आहे, यास सर्वस्वी कंपनी जबाबदार आहे, कंपनी व्यवस्थापकावर भारतीय दंड संहिता कलम 106 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापना समवेत चर्चा करून पुढील 8 दिवसात कै. रामपाल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात येईल.”
– श्री संतोष अण्णा बेंद्रे, संस्थापक व अध्यक्ष, शिवगर्जना कामगार संघटना,
