रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे याने त्याचे साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार, दांडके यासारख्या घातक हत्यारांचे मदतीने यापूर्वी गंभीर गुन्हे करून शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील निमोणे, निर्वी, गोलेगाव,शिरुर शहर व रांजणगाव एम. आय. डी. सी. परिसरात आपले गुन्हेगारी क्षेत्र वाढवुन सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत माजविण्याचे काम केलेले आहे.
सराईत आरोपी संकेत ज्ञानदेव काळे याने ४ महिन्यांपूर्वी त्याचे २ साथीदारांसह रात्रीच्या वेळी निमोणे गावचे हद्दीत साईगार्डन हॉटेलवर जावुन हॉटेलमधील वेटरला झोपेतुन उठवुन त्याचे हॉटेलमध्ये घुसुन हॉटेल चालू ठेवण्याकरिता ५,०००/- रु. ची खंडणी मागुन वेटरच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५३/२०२३ भा.दं.वि.क. ३०७, ४५२, ३८४, ३८६, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा घडले ठिकाणावरून आरोपी संकेत ज्ञानदेव काळे व त्याचे इतर २ साथीदार हे पळुन गेल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता शिरूर पोलीस स्टेशनकडील वेगवेगळी पथके त्याचा अहोरात्र निमोणे, निर्वी, शिरूर, न्हावरा, श्रीगोंदा, बेलवंडी परिसरात शोध घेणे चालु होते.
दि.२०/०७/२०२३ रोजी पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सराईत
आरोपी संकेत ज्ञानदेव काळे वय २४ वर्ष, रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे याची बेलवंडी फाटा,ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे दु-व्हीलर पंक्चर झालेली असुन तो बेलवंडी फाटा येथे पंक्चर दुकानात पंक्चर काढत आहे. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपी संकेत काळे यास शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीविरूध्द यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, किडनॅपिंग, दुखापत,खंडणी, मारामारी, धमकावणे यासारखे (०७) गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी संकेत ज्ञानदेव काळे वय २४ वर्ष, रा.निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे हा शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५३ / २०२३ भा.दं. वि. क. ३०७, ४५२, ३८४, ३८६, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ यास दि. २१/०७/२०२३ रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोो, शिरूर न्यायालय यांच्यासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि. २५/०७/२०२३ रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास चालु आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई एकनाथ पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण अंकित गोयल (आ.पो.से.),
मा. अपर पोलीस अधीक्षक सोो, पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोप, शिरूर उपविभाग यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन, संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोसई एकनाथ पाटील, पो. ना. विनोद मोरे, नाथसाहेब जगताप, पो. अं. रघुनाथ हाळनोर,पवन तायडे, नितेश थोरात, प्रविण पिठले, सचिन भोई यांनी केलेली आहे.