वीजकर भरून सुद्धा वीजखांब,वीजदिवे विना वाडेगावातील ग्रामस्थ अंधारात
विविध चौकामध्ये वीजेचे खांब उभारून वीजदिवे त्वरित लावावेत:राजेंद्र इंगळे यांची ग्रामपंचायतीकडे मागणी
सुनील भंडारे पाटील
वाडेबोल्हाई गावामध्ये वाडेगाव येथे विविध रहदारीच्या लोकवस्तीत वीजखांब नसल्याने वीजदिवे लावता येत नाही.त्यामुळे रहादारीच्या लोकवस्ती ठिकाणी रात्रीच्या वेळी परिसरात उजेडाविना सर्वठिकाणी अंधार पसरत आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी सरपटणारे प्राणी दिसून येत नाही तर चोऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.गावामध्ये जिथे वीजेचे खांब नाहीत तेथे वीजेचे कनेक्शन नेहून खांब उभारून वीज दिवे लावण्याची गरज निर्माण झाली आहे.मात्र याकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देणे गेजेचे आहे.ग्रामपंचायत वीजबंती कर ग्रामस्थांकडून आकारत असून सुद्धा जिथे लोकवस्ती चौकात वीजखांब पाहिजे,वीज दिवे पाहिजेत तिथे तातडीने लक्ष घालून वीजखांब व त्यावर वीजदिवे लावावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत बोल्हाई देवी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र इंगळे यांनी माहिती देताना सांगितले की,वाडेगाव येथील महेश थोरात,विजय ढवळे,काळूराम ढवळे,नजीरभाई शेख, सह आदींची घरे असलेल्या चौकात वीजखांब नाही.त्यामुळे येथील चौकात वीजदिवा कोठेही नसल्याने हा चौक रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधारात असतो.या चौकात रात्रीच्या अनेक वेळा सरपटणारे प्राणी बाहेर येतात तसेच रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोर आलेले येथील चौकातील ग्रामस्थांनी पाहिले आहेत.त्यामुळे या चौकात ग्रामपंचायतीने त्वरित पाहणी व सर्वेक्षण करून चौकाच्या मध्यभागी वीजखांब त्यावर विजदिवे लावण्याची गरज आहे.आम्ही बऱ्याच वर्षांपासून गावच्या लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित लोकनेत्यांना या चौकात विजेचा खांब उभारावा व वीजदिवे लावण्यासाठी पाठपुरावा केला परंतु याकडे गावचे लोकप्रतिनिधी,गावचे प्रतिष्ठित लोकनेते यांनी आमच्या मागणीकडे अनेक वर्षांपासून फक्त काम करण्याची आश्वासने देऊन दुर्लक्ष केले असल्याने येथील ग्रामस्थ अक्षरशा वैतागून हैराण झालेले आहे.याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झालेले आहे.या चौकातील आम्ही व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा वीजकर,वीजबंती कर सातत्याने भरीत आहे.त्यामुळे यापुढे तरी त्वरित ग्रामपंचायतीने या चौकामध्ये वीजेचे खांब उभारून वीजदिवे त्वरित लावावेत.अन्यथा ग्रामपंचायतीची तक्रार वरिष्ठ स्तरावर करणार असल्याचा इशारा बोल्हाई देवी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र इंगळे यांनी दिला आहे.
वाडेगाव येथील ग्रामस्थ बोल्हाई देवी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र इंगळे,महेश विलास थोरात,विजय ढवळे,काळुराम ढवळे,नजीर शेख,अरुण शिंदे,गोरख थोरात,आदी ग्रामस्थांनी चौकात ग्रामपंचायतीने त्वरित वीजखांब उभारून त्यावर त्वरित विजदिवे लावावेत यासाठी पाहणी केली.
ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून दिवाबत्ती वीज कर घेतात.परंतु जिथे लोकवस्ती चौक आहे तिथे वीजेचे खांब उभारून त्यावर वीजदिवे लावलेच पाहिजेत.आमच्या गावातील घरासमोर विजेचा खांब,विजेचा दिवा नसल्याने चौक परिसर रात्रीच्या वेळी अंधारात येत असल्याने येथे ग्रामपंचायतीने पाहणी करून त्वरित वीज कनेक्शन जोडून नवीन खांब चौकात उभारून त्यावर वीज दिवे लावावेत.
काळुराम ढवळे,सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक,वाडेबोल्हाई
जेथे जेथे वीजपोल,वीजदिवे लाईटची आवश्यकता आहे त्या ठिकाणची पाहणी करून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज खात्याला कळवून कार्यवाही करून वीजपोल उभारून वीजदिवे बसवून परिसर प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करू.त्यासाठी मागणीचे अर्ज ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे.राजेंद्र इंगळे यांनी केलेल्या मागणीनुसार त्वरित चौकाची पाहणी करून वीजपोल उभारून वीजदिवे लवकरात लवकर लावण्यासाठी कार्यवाही करून काम करू.