ग्रामसभा सुरु झाल्यानंतर ग्रामसेवक विनोद आटोळे यांनी विषयपत्रिकेवरील पिण्याच्या पाण्याची टंचाई व प्रतिबंधात्माक उपाय योजना व चालू वर्षाचा कृती आराखडा तयार करणे, नरेगा अंतर्गत समृध्द लेबर बजेट करणे, मतदान यादी अद्यावत करणे आदी शासकीय विषय वाचून दाखविले व त्या सर्व विषयाना मंजूरीही देण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीचा विषय आल्यानंतर इच्छुकांची नावे समोर येवू लागली. पाच नावे अध्यक्षपदासाठी आल्यानंतर अध्यक्ष निवडीवरुन दोन गटात मत – भेद निर्माण झाले. गोंधळ सुरु झाल्यानंतर ग्रामसभेत हमारातुमरी सुरु झाली. यामध्ये ग्रामसेवक व सरपंचासह पदधिकार्यानी मध्यस्थी करण्याचा प्रयग्न केला, मात्र दोन गट कोणाचे काहीही ऐकायाला तयार नव्हते. दोन गट आमने – सामने एकमेकांवर भिडत शिवीगाळ झाली. नंतर कार्यकर्त्यामध्ये धराधरी झाली. अखेरला ग्रामसेवक व पदधिकार्याना ग्रामसभा आवरती घ्यावी लागली. त्यामुळे येथील ग्रामसभा तंटामुक्तीच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या गोंधळा मुळे परिसरात चांगलीच गाजली.
