पुणे नगर महामार्ग लगत पाईपलाईनच्या खोदकामामुळे महामार्ग लगत मोठमोठे खड्डे तयार झाले असून खोदलेली माती सर्रासपणे लोणीकंद येथे रस्त्यावर टाकली जात आहे, त्यापासून नागरिकांना व प्रवाशांना धोका आहे तसेच अपघात होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत असून ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पूल तसेच जयस्तंभाला धोका असल्याच्या तक्रारी पुणे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त असून हे काम काही काळ बंद होत आहे, नागरिक शांत झाले की परत हे काम चालू होत आहे, अशी वस्तुस्थिती या ठिकाणी दिसत आहे, त्याचप्रमाणे संबंधित पाईपलाईन खोदकामामध्ये ठेकेदाराकडून परवानगी मधील नियमांचे उल्लंघन होत असून,
यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, पुणे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हे काम कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,
