March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

        वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील माहेर संस्था मुलांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम नेहमी करित असते.गेल्या 15वर्षा पासून विविध 35 प्रकारचे खेळ च्या माध्यमातून 4 दिवस लाल,पिवळा,हिरवा आणि निळ्या या 4 संघात विभागणी करून संस्थे मधील 570 मुलांनी क्रिडा महोत्सव सुरुवात सुरू झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावर्षीचे घोष वाक्य विजेयाची सुरवात ऐकतेने होते. 

        या कार्यक्रमास आशियन कुस्तीपटू सोनेरी पदक विजेता सुजय तनपुरे, आंतराष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली तोडकर,महाराष्ट्र व हिंद केसरी अभिजीत कटके,उद्योजक दादा वाजे वडेवाले,माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, उदयकांत ब्राम्हने, मंगेश शिवले,आशोक जगताप, मोना दिदि,डॉ.कार्मेल, जेफ,हेमंत आरगडे,जय पाठक

यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन,अध्यक्षा हिराबेगम मुल्ला,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वस्त योगेश भोर, सहसंचालक रमेश दुतोंडे,आनंद सागर,प्रकाश कोठावळे,क्रिडा शिक्षक प्रशांत गायकवाड,सह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कांबळे, सूत्र संचालन रमेश दुतोंडे आभार प्रदर्शन मंगेश पोळ यांनी केले.