March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

             पुण्यामधील कोंढवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांना 50 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी कारवाई करून ताब्यात घेतले आहे,          

 

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 1055 / 2022, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7अ ,12, अन्वये लाचखोर लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे, पोलीस शिपाई अभिजीत विठ्ठल पालके, यांनी 50 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे,       

 

तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे चार्ट शीट मध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे आई वडील व बहिण यांना अटक न करण्यासाठी दगडे व पालके यांनी 50 हजारांची लाच मागितली तशी तक्रार ला प्र वी पुणे यांना प्राप्त झाली, सदर तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले,  दगडे व पालखी यानी तडजोडी आण ती 50 हजारांची लाच मागणी केली, हे सिद्ध झाल्यानंतर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पुढील तपास ला प्र वी  पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत,     

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केला,