याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे त्यांचे रक्कम रुपये 1,43,000/- एवढ्या रकमेचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी दाखल केले होते, सदर बिलाचे मंजुरीसाठी उपाधीक्षक कार्यालय आरोग्य, पुणे विभाग, येथे काम करणारा लोकसेवक कुंभार उदवाहक याच्याकडे दिले होते, त्याने बिलाची रक्कम कमी करण्यासाठी दोन टक्के रक्कम प्रमाणे 3000 रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांना प्राप्त झाली होती, पडताळणी दरम्यान वरील कारणासाठी लोकसेवक उद वाहक कुंभार याने 3000 रुपयांची लाच मागणी करत पंचां समक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांनी रंगेहात पकडले त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
