रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
सोनेसांगवी (ता, शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण च्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी गावातील तरुणांनी चौंडी ते सोनेसांगवी या मार्गावरून उत्सवासाठी ज्योत आणली , त्या नंतर सकाळी दहा वाजता प्रतिमा पुजन व गावातील दोन चौकांचे छञपती शिवाजी महाराज चौक व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे नामांतरण करण्यात आले. दुपारी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रतिष्ठाण च्या वतीने
गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ३१ लोकांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान सोनेसांगवी ग्रामपंचायतच्या वतीने माया दाते व लिलाबाई ढेरंगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे सरपंच रेखा काळे यांनी सांगितले.
या प्रसंगी सरपंच रेखा काळे , उपसरपंच रमेश बो-हाडे , चेअरमन दत्ताञय कदम , मल्हारी काळे , हिरामण काळे , भाई बो-हाडे , शहाजी दाते , शंकर शेळके , सुनिल शेळके , संगिता डांगे , आनंदा डांगे , सुनंदा डांगे , प्रमिला काळे , माऊली बो-हाडे , मनोज बो-हाडे , अशोक बो-हाडे , अस्तिक बो-हाडे , यादव पाडळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्नेने उपस्थित होते. युवा व्याख्याते सागर मदने यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली असल्याचे उपसरपंच रमेश बो-हाडे यांनी सांगितले.

