कदमवाकवस्ती येथील लोणी काळभोर स्टेशन परिसरात राहत असलेल्या शिवतेज या सात वर्षीय बालकाने खेळता खेळता दोन रुपयाची दोन नाणी
या मुलाचा डॉक्टरांनी एक्सरे केल्यावर निष्पण झाले की बालकाने एक नाही तर दोन नाणी गिळाली आहेत. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. परंतु डॉ. विक्रम पाटील यांनी मोठ्या शिताफिने दोन्ही नाणी बाहेर काढली. यावेळी बोलताना डॉ. विक्रम पाटील म्हणाले कि,ग्रामीण भागात अश्या प्रकारच्या घटना सारख्या घडत असतात विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल परंतु कुटुंबियांकडून अर्धवट माहिती मिळाली, माहितीने घरी केलेले उपचार बालकांसाठी हानिकारक ठरवू शकते. त्यामुळे अशी घटना घडल्यास रुग्णास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. डॉ. विक्रम पाटील यांनी आजपर्यंत बालकांनी गिळलेले नाणी, सुया, वस्तरा ब्लेड,चुंबक, दात वस्तू बाहेर काढल्या आहेत परंतु एका वेळेस दोन नाणी हे त्यांनी पहिल्यांदाच काढली असल्याची महिती दिली,
