March 30, 2026
सुनिल भंडारे पाटील 
      तळेगाव ढमढेरे शेणाचा मळा (ता शिरूर) येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरी मध्ये गेल्या तीन दिवसापासून कुत्रा पडलेला होता या कुत्र्याला वनविभाग रेस्क्यू ऑपरेशन च्या वतीने सही सलामत बाहेर काढण्यात आले,     

 नरके हे आपल्या विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज आला त्यांनी डोकून पाहिले असता एक कुत्रा त्यांना कपारीच्या कडेला बसलेला दिसला, बरेच प्रयत्न करून बाहेर काढता न आल्याने शेतकरी मंगेश नरके यांनी तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष सर्पमित्र गणेश टिळेकर यांच्याशी  संपर्क साधून, विहिरीमध्ये कुत्रा पडला असल्याची माहिती दिली. तत्काळ माहिती मिळताच नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सदस्य – वैभव निकाळजे, राजेंद्र डफळ, राहुल गायकवाड, भावेश गायकवाड, राज जावळे, विशाल काळे, टीम सह हजर झाले सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून सोडून दिले,