सकाळी ६ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज,कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीचा महाभिषेक होणार आहे.७ वाजता मुक पदयात्रा.८.३०.वाजता शासकीय पूजा जिल्हाधिकारी पुणे यांच्या हस्ते.९ ते १०.३० पर्यंत ह.भ. प शिरीष महाराज मोरे,देहुकर यांचे कीर्तन.११.३०.वा.समाधीवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी.११.४५. गृहविभागा तर्फे शासकीय मानवंदना.१२.वा.५ मी.सभा व पुरस्कार वितरण.दुपारी २ वाजता पुरंदर ते वढू – तुळापूर पालखीचे आगमन.सायंकाळी ७ वाजता ऐतिहासिक नाटक सादर करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तर प्रमुख प्रवक्ते म्हणून अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनाचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा व सुदर्शन दूरचित्रवाणीचे संपादक सुरेशजी चव्हाणके हे असणार आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी, नेते मंडळी,आजी माजी सरपंच,उपसरपंच तसेच पंचक्रोशीतील शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
पुणे जिल्हा पोलीस आयुक्तालय तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने, चोख बंदोबस्त तसेच पार्किंगची सुव्यवस्था करण्यात आली आहे, राज्यातून तसेच देशामधून जास्तीत जास्त संख्येने शंभू भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे,


















