March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
     निमोणे (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम दि. 2 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने संपन्न झाला, 

भारतरत्न लाल बहादूर शास्त्री तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, व्यसनमुक्तीचा संदेश देऊन भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात करून वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा पाचर्णे, शिरूर भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरूर भाजपा उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, सरचिटणीस माऊली भैरट, निमोणे उपसरपंच डॉ. संतोष जाधव, डॉ.दत्तात्रय जाधव, चेअरमन दत्तात्रय जगदाळे, मा. सरपंच रवींद्र थोरात,ग्रा सदस्य अतुल पांडुरंग दुर्गे, ग्राम. सदस्य श्यामकांत ढोरजकर, डॉ. धनंजय काळे , युवा कार्यकर्ते मयूर ओस्तवाल, मा.चेअरमन हिरालाल जाधव, मा.चेअरमन नवनाथ काळे, श्रीकांत दुर्गे, योगेश शिवाजी काळे, तुषार जांभळे, अमोल महाजन, संतोष काळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्ता मुलमुले समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद सुरवसे, आरोग्य सहाय्यक गोविंद वाडेकर, कनिष्ठ सहाय्यक गौरव बेंद्रे, पुरुष परिचार रामचंद्र गोबारे, वाहन चालक महेंद्र भोस इत्यादी अधिकारी, निमोणे ग्रामस्थ, निमोणे, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, करडे, मोटेवाडी, गोलेगाव परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते .