March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              पुणे जिल्ह्यातील भोर येथील पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7,12 नुसार 1)लोकसेवक,युवराज दिनकर कदम (वय 52 वर्ष, पद आगार व्यवस्थापक भोर, वर्ग 2  राज्य परिवहन महामंडळ, भोर जिल्हा पुणे,)
2) विजय नामदेव राऊत (वय 51 वर्ष, चालक, वर्ग 3, राज्य परिवहन महामंडळ, भोर जिल्हा पुणे,) या दोघांना 4 हजारांची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे  यांनी रंगेहात पकडले,           

     याबाबतीत तक्रारदार यांच्यावर राज्य परिवहन महामंडळ खाते अंतर्गत कारवाई न करण्यासाठी तसेच रजा मंजूर करण्यासाठी आगार व्यवस्थापक कदम, याने 4000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता कदम याने 4 हजार रुपये लाचेची मागणी करून, राऊत यांच्याकडे देण्यास सांगितले, त्या लाचेची रक्कम राऊत याने स्वीकारली असता दोघांनाही रंगेहात ताब्यात घेण्यात आले आणि गुन्हा नोंदवण्यात आला, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने करत आहेत,

       सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केला,