आपण आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला असता जिल्हा अंतर्गत ग्रामपंचायत, विविध विकास कार्यकारी सोसायटी, विविध प्रकारच्या सहकारी संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या कालावधीमध्ये किती पत्रकारांनी निवडणुका लढवल्या किंवा किती पत्रकार जनतेचे प्रतिनिधी म्हणून पुढे गेले अशी उदाहरणे अजिबात नाहीत, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांची निशुल्क समाजसेवा कित्येकदा तर समाजसेवा करत असणाऱ्या अशा व्यक्तीला स्वतःचा प्रपंच चालवणे देखील मुश्किल आहे, निशुल्क समाजसेवा करणारा समाजामध्ये असा वर्ग आहे का कुठला? पत्रकारिता करणारा व्यक्ती समाजामध्ये हुशार आणि विद्वान समजला जातो, समाजामध्ये अनेक अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार आहे मग तो लोकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही का? आपल्या हुशारीने लोकांची सेवा करू शकत नाही का? मग पत्रकारांना एवढा विरोध का ही समाजातील वस्तुस्थिती आहे,

