रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमेंद्र चंद्रकांत शहा (वय ४४ वर्षे) रा. ४०५ जिवन काँ. हौसिंग सोसा. लि. /जिवन सप्ना, एम.जी. क्रॉसरोड नं.०४, पटेलनगरच्या पाठीमागे, कांदीवली वेस्ट, मुंबई यांचा इंडस्ट्रीयल हार्डवेअर मटेरीयल सप्लायचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे कंपनी फिटेड सीएनजी इर्टीका क्र. एम एच ४७ बी बी ०७२० ही चारचाकी गाडी असुन (दि.२२) रोजी पहाटे ५ वा. च्या सुमारास हि गाडी घेवुन पुणे जिल्ह्यातील हार्डवेअर मटेरीयल सप्लाय केलेल्या दुकानदारांकडुन उधारीचे पेमेंट जमा करण्यासाठी आले होते. त्यांनी दिवसभर हडपसर, ऊरळीकांचन, कुरुकुंभ व बारामती परिसरातील हार्डवेअर दुकानदारांकडुन उधारीचे पेमेंट जमा करुन बारामती येथे मुक्काम केला.
त्यावेळी शहा यांनी गाडीकडे धाव घेतली असता गाडीने आतील बाजुने पुर्णपणे पेट घेतला होता. त्यावेळी शहा यांनी दरवाजा उघडुन पैसे ठेवलेली बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता पैशाच्या बँगने पुर्णपणे पेट घेतला होता. शहा यांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने बँग बाहेर काढुन पाहिले असता बॅगमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या होत्या. तसेच इर्टीका गाडी क्र. एम एच ४७ बी बी ०७२० हि पुर्णपणे जळुन गाडीचे नुकसान झाले.त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हि आग आटोक्यात आणली. यावेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्याने ट्राफिक जाम झाले होते. या घटनेत इर्टिका गाडी आणि २ लाख रुपये रोख रकमेसह सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.


