धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर रक्षाबंधनाचाअनोखा उपक्रम, यावर्षी वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील महिलांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले, प्रत्यक्ष शंभू महाराजांना राखी बांधून बंधू भावाचा संदेश दिला, ऐतिहासिक काळामध्ये पहिल्यांदाच महिलांनी असा उपक्रम राबविल्याने महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे,
आतापर्यंत समाधीस्थळावर मोठ्या उत्साहाने वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम पार पडत आहेत, परंतु रक्षाबंधना संदर्भात या अगोदर असा उपक्रम कोणाच्याही लक्षात आला नव्हता, यावर्षी गावातील शंभू व शिवप्रेमी महिला यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा विचार करून प्रत्यक्ष शंभूराजांनाच आपला सक्का भाऊ म्हणून राखी बांधल्याने, या अनोखा उपक्रमाविषयी सर्वत्र चर्चा चालू आहे, शिवाय महिलांचे कौतुक देखील होत आहे, या रक्षाबंधन प्रसंगी अंजली देशमुख, सुनिता भंडारे, अर्चना शिवले, नयना आरगडे, कौशल्या यशवंत, भक्ती देशमुख, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,


