March 30, 2026
हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
           इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलु गेला गगनावरी

             या संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगानुसार माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मार्गदर्शनानुसार हवेली तालुका माहिती सेवा समितीचे अध्यक्ष कमलेश बहिरट यांनी वारघडे यांच्या खांद्याला खांदा लावत वृक्षारोपणामध्ये तालुक्यामध्ये बकोरीतील देवराई वनराई प्रकल्पामध्ये 60000 पेक्षा जास्त वृक्ष लावण्यामध्ये सहभाग घेऊन समाजामध्ये एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे नुकताच कमलेश बहिरट यांचे आजोबा कै. विठ्ठल बहिरट यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वाघोली येथे संपन्न झाला,

             या कार्यक्रमाला अनुभवी कीर्तनकाराला संधी न देता नवोदित कीर्तनकार ह भ प अभय महाराज अमृतराव मोकमपल्ले यांना संधी देऊन एक चांगली कीर्तन रुपी सेवा वाघोली आणि परिसरातील नागरिकांना करून दिली त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे याप्रसंगी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांसह सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,