महाराष्ट्र राज्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड व पुणे जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक साईनाथ वाळकेपाटील यांनी भरारी न्यूज शी संपर्क करून स्वतः आंदोलनामधील सुरुवातीचा व्हिडिओ पाठवला आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट त्यामध्ये दिसत आहे की, आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा चालू असताना पोलिसांनी अचानक पणे अमानुषपणे लाठी चार्ज केलेला दिसत आहे, वृद्ध महिला तसेच आंदोलनकर्ते ” मारू नका हो साहेब ” असे बोलताना स्पष्ट ऐकायला येत आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला दगडफेक केली हे स्पष्ट खोटे असल्याचे यावरून सिद्ध होत आहे,
त्यामुळे मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला दगडफेक केल्याचे ज्यांनी ज्यांनी विधान केले आहे हे साफ चुकीचे असून या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलना मध्ये कायदे सुव्यवस्थेचा विचार न करता अमानुषपणे गोरगरीब लोकांवर वृद्ध महिला तसेच पुरुषांवर लाठी हल्ला करण्यात आला असून आता नव्याने हिटलर शाही अमलात आली का काय अशी चर्चा आंदोलनकर्त्यामध्ये जोर धरू लागली आहे, या घटनेमध्ये शेकडो आंदोलनकर्ते जखमी झाले असून राज्याच्या सर्व भागांमधून या घटनेचा निषेध केला जात आहे,
